जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्व
आषाढी एकादशी माहिती मराठी
आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषत: महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्लाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात. या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त भगवान विष्णूची उपासना करतात. आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात.
वैष्णावांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.